पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.
दिनांक ७/१०/२०२६ रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र, श्री. चंद्रकिशोर मीणा यांच्या हस्ते पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उत्कृष्ट गणपती विसर्जन पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन केले.
‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व छत्र्यांचे वाटप व मिशन RAPID’ अंतर्गत नागरिकांना रत्नागिरी पोलीस व्हॉट्सअॅप चॅटबॉटच्या माध्यमातून विविध पोलीस सेवा व माहिती सहज उपलब्ध होणार आहे.
रत्नागिरी पोलीस दलाने अत्याधुनिक तांत्रिक तपास आणि CEIR प्रणालीच्या माध्यमातून हरविलेले व चोरीस गेलेले 103 मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत मिळवून दिले. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र श्री. चंद्रकिशोर मीना (भा.पो.से.) यांच्या हस्ते हे मोबाईल नागरिकांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी नागरिकांना मोबाईल हरविल्यास तात्काळ CEIR वर नोंदणी करून पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे तसेच सायबर फसवणुकीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच उत्कृष्ठ कामगिरी करणा-या अधिकारी/कर्मचारी यांचा गुणगौरव करण्यात आला.
एकूण 4 पैकी पान 1