पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.
ता.27/02/2026 रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र श्री. संजय दराडे यांचे हस्ते पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयात सोशल मीडिया लॅब चे उदघाटन करण्यात आले, या वेळी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व इतर पोलीस अधिकारी अंमलदार उपस्थित होते. सोशल मीडिया लॅब द्वारे पोलीसांकडून सोशल मीडिया प्लँटफॉर्मसवर भडकावू, आक्षेपार्ह, कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकणाऱ्या पोस्टवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत चौक, सावरोली येथे नेमण्यात आलेल्या बंदोबस्ताची प्रत्यक्ष पाहणी करून खात्री केली.
विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र यांनी रायगड जिल्हा भेटी दरम्यान मतमोजणी तयारी बाबत आढावा घेवून रायगड जिल्हयामध्ये 09 ठिकाणी होणाऱ्या मतमोजणीचा सविस्तर आढावा घेवून मार्गदर्शन केले तसेच खोपोली नगरपरिषद निवडणुक 2025 येथील मतमोजणी केंद्रास भेट देवून जिल्हा प्रशासनाच्या मतमोजणीपुर्व बंदोबस्त तयारीचा आढावा घेतला व सर्व अधिकारी यांना मार्गदर्शन केले.
एकूण 4 पैकी पान 2