आज रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री संजय दराडे यांचे हस्ते रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी हरवलेले व CEIR Portal द्वारे हस्तगत केलेले एकूण 187 मोबाईल तक्रार दारांना परत करण्यात आले, या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नितिन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री महामुनी व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. या वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी रत्नागिरी पोलीस व तक्रारदार यांचे अभिनंदन केले.