ता.27/02/2026 रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र श्री. संजय दराडे यांचे हस्ते पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयात सोशल मीडिया लॅब चे उदघाटन करण्यात आले, या वेळी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व इतर पोलीस अधिकारी अंमलदार उपस्थित होते. सोशल मीडिया लॅब द्वारे पोलीसांकडून सोशल मीडिया प्लँटफॉर्मसवर भडकावू, आक्षेपार्ह, कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकणाऱ्या पोस्टवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे