
रत्नागिरी पोलीस दलाने अत्याधुनिक तांत्रिक तपास आणि CEIR प्रणालीच्या माध्यमातून हरविलेले व चोरीस गेलेले 103 मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत मिळवून दिले. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र श्री. चंद्रकिशोर मीना (भा.पो.से.) यांच्या हस्ते हे मोबाईल नागरिकांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी नागरिकांना मोबाईल हरविल्यास तात्काळ CEIR वर नोंदणी करून पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे तसेच सायबर फसवणुकीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच उत्कृष्ठ कामगिरी करणा-या अधिकारी/कर्मचारी यांचा गुणगौरव करण्यात आला.