<p>गुन्हेगारी आणि गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीसांनी अनेक कठीण आव्हानांना तोंड देत अथक परिश्रम घेतले आहेत. आधुनिकीकरण, माहिती तंत्रज्ञानाचा समावेश, सायबर व महिला सुरक्षा आणि उत्तम वाहतूक व्यवस्थापन यासारख्या विविध प्रमुख उपक्रमांनी परिणाम देण्यास सुरुवात केली आहे. जनतेच्या पाठिंब्याशिवाय पोलीस प्रभावी होऊ शकत नाहीत यावर माझा ठाम विश्वास आहे. गुन्हेगार, समाजकंटक, तस्क्र इत्यादी विरुध्दची मोहिम जनतेच्या सक्रिय सहकार्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. मी या संधीचा फायदा घेत सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित करतो आणि जनतेच्या सेवेसाठी समर्पित पोलीस एक प्रभावी, निर्भय आणि कार्यक्षम संघटना बनवण्याचा आमचा संकल्प पुन्हा एकदा व्यक्त करतो.</p>